r/pune • u/Snoo-8502 • 1h ago
संस्कृती/culture I made a Marathi wall-calendar app for myself: one म्हण a day. Anyone want to try it?
लहानपणी स्वयंपाकघराच्या भिंतीवर Kalnirnay सारखं calendar असायचं, आणि पानाच्या मागे जे छापलेलं असायचं ते मी नेहमी वाचायचो. ते खूप miss करत होतो, म्हणून स्वतःसाठी एक छोटं Android ॲप बनवलं: दिनांक.
२०२६ च्या प्रत्येक दिवसासाठी एक पान: एक म्हण, वाक्प्रचार किंवा संतांची ओळ (तुकाराम, ज्ञानेश्वर, रामदास, जनाबाई…).
- म्हण मोठ्या अक्षरात, जुन्या छापील calendar सारखी
- प्रत्येक शब्दाचा उच्चार आणि अर्थ
- मराठी आणि English मध्ये अर्थ, त्यामागची गोष्ट आणि वापराची तीन उदाहरणं
- सणांच्या दिवशी खास पान आणि सणाविषयी माहिती (दिवाळीला दिवे सुद्धा पेटतात 🪔)
- खऱ्या calendar सारखं पानावर लिहिता येतं: वाढदिवस, आठवणी
- कोपरा उचलून कालचं पान उलटायचं, आणि home screen widgets सुद्धा आहेत
पूर्णपणे मोफत: जाहिराती नाहीत, sign-up नाही. ॲप मराठी किंवा English मध्ये वापरता येतं. किती लोक वापरतात एवढंच निनावी पद्धतीने कळतं, आणि settings मधून ते बंदही करता येतं. तुमच्या नोंदी फोनबाहेर कधीच जात नाहीत.
Play Store वर टाकलेलं नाही, फक्त स्वतःसाठी बनवलं होतं. कोणाला वापरून बघायचं असेल तर comment करा किंवा DM करा, APK पाठवतो (सध्या फक्त Android).
एक प्रामाणिक गोष्ट: मजकूर लिहिताना AI ची मदत घेतली आहे आणि मी अजून तपासतोय. एखादी म्हण, अर्थ किंवा शब्द चुकीचा वाटला तर नक्की सांगा. हीच सगळ्यात मोठी मदत होईल 🙏